युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या  नेतृत्वात महिलांचे  मोदी सरकार विरोधी आंदोलन 

0
2
धाराशिव – आज धाराशिव येथे  छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांच्या उपस्थितीत  महिला प्रदेश सचिव  सौ संगीता काळे  यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी केंद्र सरकार / राज्य सरकार यांच्या काळात  महिलांवर होणारे अत्याचार, महागाई, तसेच पत्रकारांवर  केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी  सक्षणा सलगर यांनी माध्यमाशी बोलताना  मोदी सरकारवर निशाणा साधत  पत्रकारावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला तर यापुढे अशी दडपशाही  खपवून घेतली जाणार  नाही असेही यावेळी त्या म्हणाल्या.प्रदेश सचिव संगीता काळे यांनी लोकशाही आणि संविधान यांचे हे दडपशाही चे सरकार पायमल्ली करत असल्याचा  निशाणा साधला.
यावेळी सरस्वती भणगे ,अश्विनी  घोडके , सिंधू कसबे ,चंदा शिंदे ,राणी कसपटे ,लक्ष्मी घोडके , माधवी रायजादे अशा अनेक महिला यावेळी आंदोलनात सहभागी होत्या.