एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या एलसीबी पीआयसह दोन आरोपी एसीबीच्या जाळ्यात…

0
40
बीड,दि.१७ मेेः-  जिल्ह्यात  पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वपूर्ण असलेल्या शाखेच्या पोलिस निरीक्षकाने लाच मागणी करून ती स्वीकारत असताना दोन सहकाऱ्यांसह एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने  पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली .लाच घेतांना हरिभाऊ खाडे वय ५२,पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा,पोलीस अधिक्षक कार्यालय बीड ,वर्ग १ रा.चाणक्यपुरी,बीड  रविभुषन जाधवर,पीएसआय,आर्थिक गुन्हेशाखा,बीड, व कुशाल प्रविण जैन,वय २९ रा.मंत्री कॅालनी,बीड,खाजगी ईसम यांनी तक्रारदारास चक्क १ कोटी रुपये लाच मागून तडजोडी अंती ३० लाख रुपयाची लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले गेले.
यातील तक्रारदार आणि त्याचा खाजगी चालक यांनी मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या ईमारतीच्या बांधकामाकरीता मटेरीयल पुरविले होते.त्याचा मोबदला म्हणुन ६० लाख रुपये  बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते.तथापी पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे बबन शिंदे व इतरांवर बॅंक अपहार प्रकरणी गुन्हा नं ३६०/२३ दाखल असुन तपास पोनी.खाडे, आर्थिक गुन्हेशाखा बीड हे करत आहेत .यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली ६० लाखांची रक्कम ही बॅंक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी करुन पोनी. खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच पोनी.खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी ५० लाख या प्रमाणे १ कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती ३० लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले.तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन ५ लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन,मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले. त्यावरुन बुधवार दि.१५/५/२०२४ रोजी सापळा कारवाई मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केली असता खाजगी इसम कुशल जैन याने पोनी.हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष ५ लाख रुपये स्वीकारले. त्यास लाच रकमेसह पकडण्यात आले.पोनी.खाडे सहायक फौजदार जाधवर व खाजगी इसम कुशाल जैन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
  सदरहू कारवाई शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.बीड,यांच्या नेतृत्वात  सापळा पथकाचे अधिकारी,पोलीस निरीक्षक युनुस शेख बीड,संतोष घोडके पोनी.अनिता ईटुबुने ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,सापळा पथकातील अविनाश गवळी,भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे,सुरेश सांगळे,स्नेहल कुमार कोरडे, गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर ला.प्र.वि.बीड यांनी यशस्वी केली आहे.