तनिषा बोरामणीकरने रचला इतिहास, वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम

0
14

औरंगाबाद, दि.21-महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (12th Result 2024) जाहीर झाला देवानगरी, उस्मानपुरा येथील वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने 600 पैकी 600 गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषा बुध्दिबळ खेळाडू असल्याने स्पोर्ट्सचे अतिरिक्त गुण तिला मिळाले आहे. या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला सिए बनायचे आहे अशी माहिती तीने डि-24 न्यूजला सांगत म्हटले की अभ्यासाचा वेळ निश्चित करुन करत असे. बुध्दिबळ स्पर्धेत सुध्दा मी वेळ देत आहे. देवगिरी काॅलेजचे प्राध्यापकांचे व आई वडीलांचे मार्गदर्शन लाभले. आई रेणुका हि सिए आहे. सध्या ती सिए असोसिएशनची अध्यक्ष आहेत. वडील सागर हे आर्किटेक्ट आहे. आईने सांगितले की तिला बुद्धिबळात रुची असल्याने 12 स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिला आयएएस बणण्याचे पण स्वप्न आहे पण सध्या ती सिएचे अभ्यासक्रम करणार असल्याचे सांगितले. देश विदेशात बुध्दिबळ स्पर्धेत सहभाग घेतला आहे.