बारावीच्या परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे सुयश

0
137

देवरी,दि.२१:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत स्थानिक छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थांनी उत्कृष्ठ यश संपादन केले.
वर्ग १२ वी विज्ञान शाखेत लिंकु शिवलाल लांजेवार हिने ६०० पैकी ४६४ गुणांसह ७७.३३% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावले. याशिवया योगेश भुमेश्वर सखरे याने ४५७ गुणासह ७६.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर तुषार परसराम बागतलवार याने ४५४ गुणासह ७५.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले.

वर्ग १२ वी कला शाखेतून नयन पुरुषोत्तम नंदागवळी याने ६०० पैकी ४७४  गुणांसह ७९ % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक, शुभम गोपाल भेंडारकर याने ४५३  गुणासह ७५.५% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर लक्ष्मी प्रभाकर सिरसाम हिने ४१० गुणासह६८.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले. महाविद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ८८.६३%  लागला आहे.
संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, सचिव अनिल येरणे, प्राचार्य मनोज भुरे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.