टेनिसपटू प्रणव कोरडेचे पुरुष दुहेरी सामन्यात उपविजेतेपद

0
6

छत्रपती संभाजीनगर,दि.३१ः– संभाजीनगरच्या प्रणव कोरडे याने ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या टूर्नामेंट मध्ये चमकदार कामगिरी करून पुरुष दुहेरीच्या सामन्यात उपविजेतेपद संपादन केले आहे.
31 मे रोजी बंगलोर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरचा टेनिस पटू प्रणव कोरडे आणि त्याचा साथीदार आर्यनजीत सिंग यांनी प्रथम फेरीत केविन कार्तिक आणि त्याचा साथीदार अखिलेश यांचा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.तसेच दुसऱ्या फेरीमध्ये फोर्थ सीडेड प्लेयर कृष्णा तेजा आणि त्याचा साथीदार अजय कन्नान यांचाही सरळ सेट मध्ये पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली.या जोडीचा सेमी फायनल मध्ये त्यांचा सामना अव्वल मानांकित जोडी मनीष गणेश आणि त्याचा साथीदार शेख मोहम्मद ठक्कर यांच्याबरोबर अत्यंत चुरशीचा 6-2,4-6,10-5 असा होऊन प्रणव कोरडे आणि त्याचा साथीदार आर्यनजीत सिंगने अत्यंत उच्च दर्जाचा खेळ करून त्यांच्यावर विजय संपादन केला.विजयानंतर त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला तसेच अंतिम फेरीमध्ये त्यांचा सामना द्वितीय सीडेड ओजस तेजो जयप्रकाश आणि मोहित मयूर यांच्याबरोबर झाला. प्रणव कोरडे आणि त्याचा साथीदार आर्यनजीत सिंग यांनी अतिशय अटीतटीच्या व उच्च दर्जाचा खेळाचे प्रदर्शन करून ह्या जोडीचा निसटता पराभव 6-4,6-3 असा पराभव झाला. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले सेटमध्ये पराभव करून अंतिम सामन्यात आयटा एक लाख टूर्नामेंट मध्ये उपविजेते पदाचा चषक पटकावला आहे . सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
प्रणव कोरडे हा गजेंद्र भोसले टेनिस अकॅडमी छत्रपती संभाजी नगरचा खेळाडू आहे. त्याला कोच गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर च्या अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अँड. श्रीकांत अदवंत व मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे मुख्य सरकारी वकील अँड. अमरजीत गिरासे व अँड. नितीन चौधरी यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.