गावोगाव एक गाव एक स्मशानभूमी करा आणि भेदभाव मोडीत काढा – धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचे प्रतिपादन

0
34

हाणंमत गवळे मुखेड/नांदेड ,दि ३१–साधू संतांनी महापुरुषांनी कधी भेदभाव केला नाही , तर आपणही असा भेदभाव करू नये. त्यासाठी गावोगाव एक गाव एक स्मशानभूमी बांधून समतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे. माणूस म्हणून आपण कोण्या जातीत जन्माला येतो हे आपल्या हातात नाही परंतु मरताना तरी त्याला माणूसपणाचा दर्जा मिळावा असे धर्मकीर्ती महाराज बोलताना म्हणाले.
त्यांनी एकूण संबंध भारताच्या महापुरुषांच्या चळवळीचा आणि संत चळवळीचा वारसा सांगितला. साधू संतांचे दाखले देत एकोपा बंधुभाव त्यांनी गावांमध्ये प्रबोधित केला. आपल्या प्रवचनातून त्यांनी संविधानाची मूल्ये लोकांना समजून सांगितली.

बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे दिलीप मारोती वाघमारे यांचे चिरंजीव अवलोकित याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक दिलीप वाघमारे तर सूत्रसंचलन शिवानंद बुध्देवार यांनी केले .प्रमुख पाहुणे सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ बोधनापोड,उपसरपंच विठ्ठल तुकडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी गायकवाड मुख्याध्यापक,छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी हे होते.
कार्यक्रमाचे आयोजक मोहनाबाई मारोती वाघमारे व मुलगा दिलीप वाघमारे हे सतत विविध सामाजिक उपक्रम घेत असतात. वृक्षारोपण असो, गरीब मुलांना मदत करणे असो, निसर्गाचे जतन वृक्षारोपण व संवर्धन, व्यसनमुक्ती असो की प्रबोधनाच्या चळवळीतला सक्रिय सहभाग असो असा विविध कार्यामध्ये दिलीप वाघमारे हे सतत क्रियाशील असतात. त्यांनी आपल्या चिरंजीवांचा हा पहिला वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला. त्याबद्दल पंचक्रोशीत चर्चा होत आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विविध शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी , पावणे व ग्रामस्थ उपस्थित होते..

यावेळी संभाजी गायकवाड मुख्याध्यापक, छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी, सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ बोधनापोड, व्यंकट गोणेकर तुकडेकर विठ्ठल, रेड्डी सर, बी.सी वाघमारे ,सोनटक्के सर ,राजेश बुरावाड ,व्यंकटेश भोसले ,उत्तम बाबळे,अभिजीत माळगोंडे, बाळासाहेब लाखे,विलास माळगे सुरेश सोनकांबळे सुरेश कुडकेकर शीलानंद बुद्देवार संदीप कटारे, गजानन वाघमारे ,दिनेश एडके, चंद्रकांत आंबेकर,बसवे सर, सदानंद भुताळे ,ज्ञानेश्वर पामंपटवार इ सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.