तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारसाठी निवड

0
5

सडक अर्जुनी.-चिखलीच्या रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रावीण्यासह प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या
गुणवंत विद्यार्थ्यांची सदर पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम गणेश महेश बोरकर, द्वितीय कु.हिमांशी अरविंद भेंडारकर व तृतीय कु. काजल ज्ञानेश्वर कोरे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयात पुढील होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षक तथा नीलकमल स्मृती फौंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही.मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम, मुख्याध्यापक एल. एम.पातोडे,शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे,सेवानिवृत्त शिक्षक आर.व्ही. मेश्राम यांच्या मुलाच्या स्मृती प्रीत्यर्थ 2004 पासून गुणवंत विद्यार्थ्यांना ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.