नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाडी बुद्रुक शिवारात जवळपास ४३६ बंदुकीच्या गोळ्याचा साठा सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळ्या पोलिस किंवा सर्वसामान्यांसाठी वापरात येणाऱ्या गोळ्या नाहीत. पावडेवाडी गावाजवळ आकाश पावडे नावाचा तरुण हा मध काढण्यासाठी गेला. सदर प्रकार त्याच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
एका नाल्यात गोळ्यांचा साठा पडलेला आढळला असून 436 गोळ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. घटनास्थळी श्वानपथकासह दहशतवाद विरोधी पथक, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या बंदुकीच्या गोळ्या लाईट मशिनगनम वापरल्या जातात, अशी पोलिसांत चर्चा असून पुढील तपास नांदेड पोलिस आहेत.