जालन्यात कल्याणराव काळेंचा विजय, रावसाहेब दानवेंचा धक्कादायक पराभव

0
52

जालना –यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालना (Jalna Lok Sabha Election 2024 Result) हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदलले. त्यामुळे यावेळी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र येथे कल्याणराव काळे यांनी विजयी कामगिरी केली आहे. काळे यांनी दानवे यांचा 65 हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे. 

रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार

1996 आणि 1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फे निवडून आले होते. 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1999मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

2009 मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती या लढतीत डॉक्टर कल्याण काळे यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 2014 साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा 2 लाख 6 हजार 798 मतांनी पराभव केला होता.