नवनीत राणांचा पराभव; काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी अमरावतीत विजयाचा गुलाल उधळला

0
47

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Result) मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली. दरम्यान पहिल्या फेरीपासून बळवंत वानखेडे हे आघाडीवर होते. त्यातच काही फेऱ्यांनंतर ही आघाडी फिरली आणि नवनीत राणांनी कमबॅक केलं. पण तरीही बळवंत वानखेडे यांनी ती पकड कायम ठेवत बाजी मारली. दरम्यान ही तिहेरी लढत अपेक्षेप्रमाणेच रंगतदार ठरली. पण अखेर अमरावतीकरांनी काँग्रेसला कौल देत हा निकल फिरवला.
तिहेरी लढतीमुळे निवडणूक चर्चेत
अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि झालंही तसंच. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. त्यातच शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. त्यामुळे अमरावतीची ही निवडणूक काहीश्या नाराजीच्या वातावरणाभोवती फिरल्याचं पाहायला मिळालं.