ना. रक्षाताई खडसे यांनी स्वीकारला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार..

0
12

नवी दिल्ली:- रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी केंद्रीय क्रीडा(Central Sports) व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून आज नवी दिल्लीत त्यांच्या मंत्रालयात पदभार स्वीकारला.

भारताला स्पोर्टिंग पॉवर हाऊस बनवणार !

आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने मी राज्यमंत्री म्हणून क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्याची अपेक्षा आहे, अशा भावना पदभार स्वीकारल्यानंतर रक्षाताईंनी व्यक्त केल्या. मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानते आणि केंद्रीय मंत्री(Union Minister) मनसुख मांडवीया यांनी आज पदभार स्वीकारल्याबद्दल मी माझ्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करते. अशा भावना त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.