ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला पदभार..
बुलढाणा:- नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात जाऊन आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री म्हणून या तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी नामदार जाधव यांच्याकडे दिला आहे.
#WATCH | Delhi: Prataprao Ganpatrao Jadhav takes charge as Minister of State (MoS) for the Ministry of Health and Family Welfare. pic.twitter.com/NfRevYW2YZ
— ANI (@ANI) June 11, 2024
यावेळी संबंधित विभागाचे सचिव तथा प्रतापरावांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य (mental health) जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा पदभार(charge) स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.