
नांदेड,दि.१५-5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून किनवट तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण व सेवानिवृत्त झालेले पंचायत समिती किनवट चे संयमी, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचे बीट शिवणी च्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला तसेच त्याच्या हस्ते शिवणी बीट तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा बीट अंतर्गत आयोजित पुरस्कार वितरण करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने हस्ते पंचायत समिती किनवट अंतर्गत केंद्रस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गोंडजेवलीतांडा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशिल शिक्षक दिलीप मारोती वाघमारे यांचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर पुरस्कार अप्पारावपेठ केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांना व गोंडजेवली तांडा शाळेच्या विद्यार्थ्यांना अर्पण करतोय सदर सन्मान हा माझा नसून तुम्हा सर्वांचा आहे मी फक्त निमित्त मात्र आहे.यावेळी अप्पारावपेठ केंद्राचे केंद्र प्रमुख सत्यनारायण कौड केंद्रीय वरिष्ठ मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर ,शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड ,गटशिक्षणाधिकारी,गंगाधर राठोड , सर्व केंद्रातील मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षक व शिक्षक बांधव , अप्पारावपेठ व शिवणी बीटचे सदिच्छा दिले.