34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ श्री. अपना गणेश उत्सव मंडळ तर्फे अनंतचतुर्दशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री. अपना गणेश उत्सव मंडळ तर्फे अनंतचतुर्दशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
195

blank

मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि हर हर शंभो फेम अभिलिप्सा पण्डा राहणार उपस्थित
आकर्षक झाकी आणि जबलपूरची आतिषबाजी चे असेल विशेष आकर्षण
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले आणि सदस्यांचे आवाहन
गोंदिया: दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री. अपना गणेश उत्सव समिती तर्फे गणेश उत्सव साजरा करण्यात आला. तब्बल ५०० वर्षांनी प्रभू श्रीरामचंद्र यांचा अयोध्येतील वनवास संपुष्टात आला आणि भव्य राम मंदिर थाटात उभे राहीले. त्याच धर्तीवर श्री. अपना गणेश उत्सव मंडळाच्या वतीने राम मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आणि भगवान गणेशाची स्थापना करण्यात आली. या वर्षी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने (दि. १७ सप्टेंबर) बाप्पा ची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले यांनी दिली असून या सोहळ्यासाठी मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच हर हर शंभो फेम अभिलिप्सा पण्डा उपस्थित राहणार आहेत. सोबतच आकर्षक झाकी आणि जबलपूरची आतिषबाजी चे विशेष आकर्षण देखील असणार आहे. कार्यक्रमाला पूर्व केन्द्रीय मंत्री प्रफुलभाई पटेल, पूर्व मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, पूर्व आमदार राजेंद्र जैन, बाळाभाऊ अंजनकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले आणि मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

blank