परभणी, दि. 1 – : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी उमेदवारांचे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व निवडणूक पारदर्शक पध्दतीने पारपाडण्यासाठी 96-परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्थिर संनियंत्रण पथक (SST), भरारी पथक (FST), व्हिडीओ संनिरिक्षण पथक (VST) व व्हिडीओ चित्रीकरण तपासणी पथक (VVT) पथक गठीत करण्यात आले असून सदर पथकाची बैठक दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 11.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीचे कामकाज सुरु असुन नियुक्त पथक परभणी तालुक्यातील 338 मतदान केंद्रांवर नियोजीत कार्यक्रमानुसार दैनंदिन भेटी देवून मतदारांमध्ये मतदान यंत्राबाबत जनजागृती करत आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये तपासुन घेवून मतदान यादीत नाव नसल्यास तात्काळ Voter Help line app दवारे आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, परभणी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार यांनी केले आहे.