गद्दारांना एमआयएम मध्ये आता जागा नाही – बॅ.असदोद्दीन ओवेसी

0
74

छत्रपती संभाजीनगर, दि.2- जे नेते पक्षातून बाहेर पडून विधानसभा निवडणुकीत पराभवाला कारणीभूत ठरलेले गद्दारांना आता एमआयएममध्ये येण्यासाठी प्रयत्न करु नये त्यांना आता पक्षात जागा नाही. आम्ही पराभवाने खचून घरी बसणारे नाही. अशा गद्दारांना जनतेने घरी बसवले आहे ज्यांना फक्त पाडायचे होते ते आता घरी बसले आहेत त्यांचे चेहरे आता जनतेसमोर आले आहे. इम्तियाज जलील हे पराभवानंतर सुध्दा मैदानात आहे. जलिल हे मुस्लिम व दलित समाजात अनडिस्प्युटेड नेते आहेत. बघायचे आहे तर समोर या इम्तियाज जलील यांच्या सोबत जनतेचा हुजुम जातो की तुमच्याकडे जातो. हे निवडणुकीत सिध्द झाले आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न घेऊन मैदानात राहावे घरी बसू नये. समोर महापालिकेच्या निवडणुका आहेत. इच्छूकांनी भ्रमात न राहता आपल्याला उमेदवारी मिळेल असा विचार करु नये मला हे आवडत नाही. जनतेत जाऊन काम करणारे व जनता सांगेल त्याला नगरसेवकाचे तिकीट मिळेल. असे

आपल्या भाषणात ओवेसींनी ठणकावले. राज्यात पराभवानंतर खचून न जाता रडत न बसता पक्ष बांधणी करु व पुन्हा 2029 मध्ये इम्तियाज जलील व एमआयएमचे आमदार निवडून आणू. जनतेवर विश्वास आहे ते आमच्यासोबत आहे ते आता सिद्ध झाले आहे. जे जिंकले त्यांचा आनंद काही दिवसाचा आहे यानंतर आमचे दिवस येतील. जय पराजय निवडणुकीत होत असतात. सर्व जाती धर्मातील लोकांनी मते दिली त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेचे ज्वलंत प्रश्न उपस्थित केले जातील. भाजपाकडे 133 आमदार असले तरी सत्ता स्थापन केली तरी मनमानी चालणार नाही. संविधानानुसार निर्णय घ्यावे लागतील. चुका झाल्या तर एमआयएम रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देईल. राज्यात एमआयएमला चांगली मते मिळाली ती वाढवण्यासाठी काम करत राहणार. एमआयएम संपलेली नाही असा इशारा विरोधकांना मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे पदाधिकारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ओवेसींनी दिला.

इम्तियाज जलील यांना पाडण्यासाठी उभे असलेल्या उमेदवारांना त्यांनी इशारा दिला की ते जेथे बसले असतील ती जागा खंडर होणार आहे. ज्यांची निवडणुकीत मिठाई त्यांनी खाल्ली असेल त्यांना मुळव्याध होईल. येणाऱ्या निवडणुकीत हे दिसणार नाही यांना जनतेने ओळखले आहे. “गद्दार मुर्दा है मुर्दा रहेंगे” “मेरी दाढी सुफेद जरुर हुवी दिल अभी जवान है” “जो बिकते है कभी उठते नही” “जो कभी नही बिकता उन्हे उरुज मिलता है” “इम्तियाज जलील मुस्कुरावो, उठो, लडते रहो मायुस मत होना अवाम हमारे साथ है” असे मार्गदर्शन करताना ओवेसींनी सांगितले. यावेळी विरोधकांवर ते चांगलेच भडकले. इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात सांगितले निवडणुकीत काय गोंधळ झाला याची माहिती देत ज्यांनी गेल्या निवडणुकीत 80 हजार मते घेतली यावेळी जनतेने त्यांना पाच हजारांवर रोखले. पराभवाने खचून न जाता काम करत राहणार. राम मंदिर वाचवण्यासाठी गेलो होतो तसेच पवित्र अजमेर शरीफ दर्गाहवर सुध्दा जाईल असा इशारा त्यांनी दिला.

मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे एमआयएम पक्षाचे पदाधिकारी यांची निवडणुकीत झालेल्या पराभवावर मंथन करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.बैठकीत सुत्रसंचलन युवाचे शहराध्यक्ष मोहम्मद असरार यांनी केले. परांडाचे उमेदवार हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी, मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांनी भाषण केले.