परभणी, 31: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 अंतर्गत प्रशासकीय विभाग/ सार्वजनिक प्राधिकरणांच्या सेवा देण्याच्या कामगिरीच्या मुल्यांकरीता तपासणीबाबतचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणास विभागप्रमुख उपस्थित होते.
राज्यातील नागरिकांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारीत करण्यात आला आहे. त्यामधील अंतभूत कलम 20 (3) तसेच कलम 20 (5)(क) मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी व्दितीय अपिलीय प्राधिकारी आपल्या अधिनस्त समस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या या कायद्यातंर्गत दिलेल्या सेवांच्या कामकाजाचे कार्यमुल्यमापन करणे आवश्यक आहे. हे कार्यमुल्यमापन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात आले.
जिल्हा समन्वयक, महाआयटी मार्फत आयोजित या प्रशिक्षणात जिल्हा समन्वयक अतुल नेहते यांनी सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, प्र. तहसिलदार (सामान्य) प्रशांत वाकोडकर, आयटी सेलचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अण्णासाहेब वाघमारे उपस्थित होते.