** बसस्थानकाच्या बांधकामाची केली पाहणी
* नवीन दोन बससेवेचा शुभारंभ
धाराशिव दि.26- परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी २५ जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला.
*दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ*
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव – मुंबई आणि धाराशिव – बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला.या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीन नवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे.आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार आहे.