प्राथमिक शाळा गोंडजेवली तांडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
22

नांदेड/दि२७::-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडजेवली तांडा व गोंडजेवली,ता. किनवट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी भाषणे,सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभात फेरी,लेझिम,बक्षिस इतर, उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन कु.प्रगती राठोड केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी पदाधिकारी ,प्रमुख पाहुणे, मातापालक व ग्रामस्थांच्या समोर ढोल च्या मार्चिंग व सलामी देऊन ध्वजारोहणांना मानवंदना दिले.
बक्षीस वितरण76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शालेय प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा त्यात डोक्यावर पुस्तक घेऊन चालणे, संगीत खुर्ची, थैलारेस ,दोरी रेस, लिंबू चमचा, दोरीवरच्या उड्या मारणे, बकेटमध्ये बॉल टाकणे, 100 मीटर धावणे ,कविता पाठांतर, रांगोळी, चित्रकला, गीत गायन आदी स्पर्धा मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर भाषणे करून उपस्थित त्यांची दाद मिळवली.यावेळी आलेले प्रमुख पाहुणे पदाधिकारी सरपंच,ग्राम पंचायत सर्व सदस्य,दोन्ही गावचे पोलिस पाटील,माता पालक,सर्व ग्रामस्थ, यांच्यासह समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बांधव उपस्थित होते.