43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home मराठवाडा/खान्देश स्व:ताच्या गुणवत्तेची कामगिरीच उत्तम – सौ.जरीना बागवान

स्व:ताच्या गुणवत्तेची कामगिरीच उत्तम – सौ.जरीना बागवान

0
24

blank

लातुर – रूकय्या बेगम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सौ.जरीना बागवान (API ) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणाल्या की स्व:ताच्या गुणवत्तेची कामगिरीच उत्तम हाच जीवनाचा पर्यीय होय असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य याहय्या कसेरी श्रीमती नाजेमा अब्बास शेख, प्रा. महेफुज़ सर (निवृत) श्री. जुनैदी सर , सहाय्यक शिक्षक , सह प्रमुख पाहुणे आसी़फ बागवान , युसूफसर प्राथमिक मुख्याध्यापक , यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालक मेळावाच्या अध्यक्ष पदावरून आपले मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य याहय्या कसेरी म्हणाले की, शिक्षण व शिक्षणाचे म्हणजे शिक्षक व विध्यार्थी मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. मान्यवर यांनी आपले विचार मांडले खरे पाहता आज पालक मेळावा हा शाळेतील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक व शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या दोघांमधील समन्वय अधिक घट्ट व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीस चालना मिळावी, या उद्देशाने पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते.
पालक मेळाव्याच्या दिवशी शाळेत उत्साहाचे वातावरण असते. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी तयारीत असतात. पालकांच्या स्वागतासाठी सजावट केली जाते. मेळाव्याची सुरुवात प्रार्थनेने होते. मुख्याध्यापक उपस्थित पालकांचे स्वागत करतात व मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करतात.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काय प्रगती केली, त्यांच्या आचार-विचारात काय बदल झाला, त्यांचे गुण-दोष काय आहेत, याविषयी शिक्षक पालकांशी सविस्तर चर्चा करतात. तसेच काही विद्यार्थी आपली कला सादर करतात – जसे की गायन, नृत्य, कविता, भाषण इत्यादी. यामुळे पालकांनाही आनंद मिळतो आणि आपल्या मुलांच्या क्षमतेबद्दल अभिमान वाटतो. पालक मेळाव्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीबद्दल माहिती मिळते. शिक्षकांना पालकांचे मत ऐकायला मिळते आणि काही वेळा शाळेच्या सुधारणा कशा करता येतील, यावर चर्चा होते. विद्यार्थीही अधिक प्रेरित होतात, कारण त्यांचे काम पालक आणि शिक्षक दोघांच्याही लक्षात येते. पालक मेळावा हा एक संवादाचा मंच आहे, जिथे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षणप्रक्रियेला अधिक फलदायी बनवतात. अशा मेळाव्यांमुळे शाळेची गुणवत्ता वाढते आणि विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होतात असाच पालक मेळावा रूकय्या बेगम हायस्कूल विद्यालय येथे , प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सेवक, पालक , विध्यार्थी, विध्यार्थ्यांनी , उपस्थित होते पालक मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.

blank