25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home मराठवाडा/खान्देश वडगाव (सि)जिल्हा परिषद शाळेची यशस्वी परंपरा कायम,सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल

वडगाव (सि)जिल्हा परिषद शाळेची यशस्वी परंपरा कायम,सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल

0
46
धाराशिव –जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर ता. धाराशिव या शाळेने दहावी परीक्षेच्या निकालात सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे प्रशालेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश मिळविले.
यंदाच्या निकालात कु. सुषमा अण्णासाहेब मोरे हिने ९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. दिव्या मारुती पाटील हिने ८८.२० टक्के गुणांसह द्वितीय तर कु. अंतरा अंतेश्वर वाडकर हिने ८७.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. अनुष्का अविनाश कांबळे हिला ८६.४० टक्के गुण मिळाले. चि. गौरव बापू पाटील व चि. विशाल रमाकांत मुळे यांनी प्रत्येकी ८५.२० टक्के गुण मिळविले असून चि. संकेत दादासाहेब चादरे याने ८४ टक्के गुण संपादन केले.
प्रशालेतील १२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दोन विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल गावचे भूमिपुत्र व पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, पंचायत समिती उपसभापती प्रमोद पाटील , अंकुश काका मोरे , गजेंद्र जाधव ,सरपंच बळीराम कांबळे ,उपसरपंच जयराम मोरे ,मुख्याध्यापिका ज्योती राऊत, शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील, केंद्रप्रमुख भालचंद्र कोकाटे तसेच शिक्षक भास्कर खडबडे, सरोजा पाटील, सुचिता शेलार, निर्मला गुरव, रेखा डाके, भूषण मदने आदींसह गुरुजी विचार मंच, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या सलग दुसऱ्या वर्षीच्या शंभर टक्के निकालामुळे समस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

See less

blank