डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला

0
11

मुंबई – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांमध्ये शुक्रवारी १९ पैशांची घसरण झाली. स्टॉक मार्केट तसेच तेल कंपन्याकडून अमेरिकन डॉलरची मागणी वाढली असल्याने डॉलर १९ पैशांनी वधारला.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरला असल्याने याचा मोठा विषय करण्याची गरज नसून रुपयामध्ये लवकरच सुधारणा होईल असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. एका डॉलरसाठी रुपयाची ६३.५३ पैशांपर्यंत घसरण झाली असून ही घसरण १३ महिन्यांपर्यंतची सर्वात मोठी घसरण ठरली आहे.