कोळसा खाणपट्टे : ई-लिलावासाठी नियम मसुदा जारी

0
7

नवी दिल्ली : सरकारने पहिल्या टप्प्यात ९२ कोळसा खाणींच्या ई-लिलावासाठी गुरुवारी नियमांचा मसुदा जारी केला आहे. पोलाद, स्पंज लोह, सिमेंट व कॅप्टिव्ह ऊर्जा यासारख्या क्षेत्रांसाठी १५० रुपये प्रतिटन एवढे किमान मूल्य निश्चित करण्यात आले आहे.

सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या २०४ कोळसा खाणपट्ट्यांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली. अधिसूचनेत म्हटले की, ‘कोळसा खाण (विशेष तरतूद) अध्यादेश,२०१४ आणि याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमान्वये कोळसा खाणींचा लिलाव करण्यासाठी अधिकाऱ्यांनी निविदेसाठी एक दस्तऐवज तयार करावा, अशी अपेक्षा आहे. या अनुषंगानेच निविदा दस्तऐवजासाठी एक दृष्टीपत्र तयार करण्यात आले आहे.’ सर्व संबंधित घटकांना २२ डिसेंबरपर्यंत यावर सूचना, आक्षेप पाठविण्याचे आवाहन केले आहे.