तिकीट तपासणी अभियानात सात लाखांची वसुली

0
13

गोंदिया दि. २४ -: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकांत आठवडाभर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानात सहा लाख ९९ हजार ३२५ रूपयांची वसुली करण्यात आली.
मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभगाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दल यांच्या सहकार्याने मंडळातून ये-जा करणाऱ्या गाड्या व रेल्वे स्थानकांत सदर अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट व अनियमित प्रवास, माल बुक न करताच वाहून नेलेल्या लगेजचे तीन हजार २२१२ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्याद्वारे सहा लाख ९९ हजार ३२५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच केरकचरा पसरविणाऱ्यांचे ५४ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून पाच हजार ५०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आले.सदर तपासणी अभियानादरम्यान २० फेब्रुवारीला सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या नेतृत्वात गोंदियात किलेबंदी तपासणी तसेच येथून ये-जा करणाऱ्या ३० मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये तपासणी करून विनातिकीट व अनियमित प्रवास तथा विनामालबुक लगेजचे ७६२ प्रकरणे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ६४ हजार २७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला