नांदेड महापालिका निवडणूक : कॉंग्रेसमध्ये नव्यांना संधी; अनेकांची कापली तिकिटे

0
13

नांदेड ,दि.24– नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूकीची कॉंगेसपक्षाची अधिकृत यादी प्राप्त झाली असून यामध्ये कॉंग्रेसने विद्यमान उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांच्यास अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकिटे कापले आहेत तर नवीन चेहऱ्यांना कॉंग्रेसने संधी देवून एमआयएम पक्षातील 5 नगरसेवकांना ऐनवेळी उमदेवारी दिली.

उमदेवारी अर्ज दाखल करण्याची दि.23 दुपारी 3 पर्यंत होती. अखेरच्या दिवसापर्यंत कोणाला उमेदवारी निश्‍चित झाली हे मात्र अनेकांना समजू शकले नाही. कॉंग्रेसने प्रत्येक वार्डात नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्यांना मात्र यावेळस बाजूला ठेवले आहे. तर एकाच घरातील 2 उमेदवारांना संधी देण्याचे कामही कॉंग्रेसने केले आहे. यामध्ये विद्यमान उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, विद्यमान नगरसेवक वाजेदा तबसूम अली खान, माजी महापौर अब्दुल सत्तार यांची सून विशेषता: करून बिनविरोध निघालेली सिट असतांनाही अब्दुल फसीया फिरदोस, बिपाशा बेगम, शंकर गाडगे, पुष्पा शर्मा, माजी स्थायी समिती सभापती गणपत धबाले, संजय मोरे व वैजयंता गायकवाड या विद्यमान नगरसेवकांसह पाच वर्षासाठी बिनशर्त पाठींबा दिलेल्या अपक्ष उमेदवार रजिया बेगम आयुब खान या देखील नगरसेकाला उमेदवारी नाकारली आहे. एमआयएम पक्षातून आलेले शेरअली खान, शेख हबीब बावजीर, चॉंद पाशा कुरेशी, फारुख हुसेन आणि अब्दुल हबीब अब्दुल रहीम या पाच एमआयएम नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे.