लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, प्रतितोळा 28 हजारांवर

0
18

नवी दिल्ली : ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्याचा दर प्रतितोळा 28 हजारांच्या घरात पोहोचला आहे.

आठवड्याची सुरुवातच सोन्याच्या भावात वाढ होऊन झाली आहे. सोन्याचा भाव १०० रुपयांनी वधारुन प्रतितोळा 28,000 रुपयांच्यावर गेला आहे. सोनेखरेदीचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने सोन्याचा भाव वधारला आहे.

भारतात सध्या लग्नराईचा काळ असल्याने सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोन्याच्या जागतिक बाजारात तेजी असल्याने सोने व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली. त्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याचा भाव प्रतितोळा 28,080 रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा दर प्रतिकिलो 39,100 रुपये आहे.

दरम्यान, सोन्याचे भाव वाधारले असतानाही सोने खरेदी मात्र वाढतानाच दिसत आहे.