टाटा समूहाची विनाअनुदानित एलपीजीची विनंती

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – टाटा उद्योग समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांना स्वयंपाकासाठी आवश्‍यक असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडवरील (एलपीजी) अनुदान न स्वीकारता विनाअनुदानित सिलेंडर खरेदी करण्याची विनंती केली आहे. स्वयंप्रेरणेने अनुदानाचा त्याग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

“ज्या कर्मचाऱ्यांना परवडेल अशा कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन एलपीजी गॅस सिलेंडर विना अनुदानित किंमतीत खरेदी करावेत‘ अशा स्वरूपाचे निवेदन टाटा समूहाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सरकारी अनुदानावरील भार कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी अनुदानाचा त्याग करण्याचे आवाहन केले आहे.