पूरबाधित कुटूंबाना 50 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0
6
  • 26 हजार 594 घरांची पडझड
  • जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
  • पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली, दि. 30 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 351 व शहरी भागातील 36 हजार 63 कुटूंबांना 39 कोटी 70 लाख 70 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 19 हजार 109 व शहरी भागातील 1280 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 10 कोटी 83 लाख 45 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

26 हजार 594 घरांची पडझड

पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 8 हजार 898 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 17 हजार 696 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 958 गोठ्यांना पुराची झळ बसली.