राष्ट्रीय PHOTOS : काळाराम मंदिरात साफसफाई ते रामकुंडावर पूजन, पाहा मोदींची भक्तिमय रुपे January 12, 2024 0 7 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी रोड शो केला. तसंच, काळाराम मंदिरात भेट दिली. नाशिक दौऱ्याचे काही अविस्मरणीय क्षणचित्र मोदींनी एक्सद्वारे पोस्ट केले आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी/X) नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात प्रार्थना केली. दैवी वातावरणामुळे आश्चर्यकारकपणे धन्य वाटत आहे. खरोखर नम्र आणि आध्यात्मिक अनुभव. मी माझ्या सहकारी भारतीयांच्या शांती आणि कल्याणासाठी प्रार्थना केली, असं मोदी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. नाशिक येथील रामकुंड येथील पूजेतही ते सहभागी झाले होते. (फोटो – नरेंद्र मोदी/X) या रामकुंडावर मोदींनी बराच वेळ घालवला. (फोटो – नरेंद्र मोदी/X) या पारायणात मोदी तल्लीन झाले होते. (फोटो – नरेंद्र मोदी/X) या पारायणात संत एकनाथांनी मराठीत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकचे वाचन झाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X) या किर्तनामुळे अत्यंत सुंदर अनुभव मिळाल्याचं मोदी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X) या विविध कार्यक्रमांनंतर मोदींनी नाशिकच्या तरुणांना संबोधित केलं. देशातील लोकशाही वाचवण्याची सर्वांत मोठी संधी युवांच्या हातात आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी/X)