बिहारच्या सामान्य शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 3558 रुपये

0
199

पाटणा(वृत्तसंस्था)दि.18ः राष्ट्रीय सॅम्पल सर्व्हे आॅफिसच्या (एनएसएसआे) २०१२-१३ मध्ये शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नाबाबत केलेल्या पाहणीनुसार बिहारच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न ३ हजार ५५८ रुपये असे सांगण्यात आले. देशात हेच प्रमाण सरासरी ६ हजार ४२६ रुपये आहे. बिहार व झार खंडसह पाच राज्यांतील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न सर्वाधिक १८ हजार ५९ रुपये आहे. पहिल्या टप्प्यात १०६५ उमेदवार मैदानात आहेत. उमेदवारांच्या शपथपत्रात मात्र ४२ उमेदवारांनी आपला पेशा शेतकरी असल्याचे नमूद केले आहे. अन्य ९३ उमेदवारांनी इतर व्यवसायांसाेबत कृषी देखील पेशा असल्याचे म्हटले आहे. ४२ उमेदवार शेती करतात. त्यापैकी सर्वाधिक शेती आैरंगाबादचे भाजप उमेदवार रामाधार सिंह यांच्याकडे आहे. २९.३९ एकर जमिनीचे ते मालक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जमालपूरचे काँग्रेस उमेदवार अजय सिंह यांच्याकडे २७.७५ एकर जमीन आहे. तिसऱ्या क्रमांकावर माेकामाचे जदयू उमेदवार राजीव लाेचन नारायण सिंह यांच्याकडे २२.५ एकर जमीन आहे. तबरेज अन्सारी व राकेश सिंह यांनीही शेती हाच पेशा सांगितला. ४२ उमेदवारांकडे ४.४७ एकर जमीन असून संपत्ती १.२५ काेटी आहे. अतरीचे रालाेसपा उमेदवार अजय सिन्हा यांची सर्वाधिक ९ काेटी ९ लाख ७२ हजार रुपये एवढी संपत्ती आहे.