संत कृपाल सिंह महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त संत राजिन्दर सिंह महाराज यांचा संदेश

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

 शिकागो-परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी अध्यात्माचा मार्ग दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला.सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी 21 ऑगस्टला परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी च्या भंडाऱ्या निमित्त त्यांच्या शिकवणुकीला उजाळा दिला.

या प्रसंगी संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी शिकागो अमेरिकेहून युट्युब वर प्रसारित केलेल्या संदेशात असे म्हटले की, परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी आपल्याला अध्यात्माचा मार्ग दाखविला आणि तो जगाच्या कानाकोप-यात पसरविला.

परम संत कृपाल सिंह जी महाराज यांची इच्छा होती की आपण स्वतःला आपल्या आत्मिक रूपात जाणावे आणि मानव जीवनाचे ध्येय पूर्ण करावे. अध्यात्माच्या या शिकवणुकीला त्यांनी संपूर्ण विश्वात नेले. त्यांचे कष्ट आणि त्यांच्या उत्कट इच्छेचा परिणाम असा आहे की, आज लाखो लोक त्यांनी दाखविलेल्या मार्गाला अनुसरून दररोज ध्यान-अभ्यासाकरिता वेळ देत आहेत. ते आपल्याला समजावीत की मानव शरीरात येऊन स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. त्यांच्या आठवणीत एकत्र येण्याचा उद्देश हाच आहे की, आपण सर्वांनी त्यांनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करावे. आपण आपले लक्ष पिता परमेश्वराकडे करावे जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्देश जो कि पिता परमेश्वराचा अनुभव करायचं आहे, याच जीवनात पूर्ण व्हावा.

संत कृपाल सिंह जी महाराज यांना बऱ्याचदा “प्रिय सद्गुरु” म्हणून संबोधले जाते. त्यांनी मानवी जीवन आणि मानव एकतेला प्राधान्य दिले आणि ध्यान-अभ्यासाद्वारे अध्यात्मिक जागृतीचा संदेश संपूर्ण विश्वात प्रसारित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांना विश्वभरात लाखो लोकांकडून या शताब्दीचे महान संत आणि मानव एकतेचे महान समर्थकांच्या रुपात त्यांचे स्मरण केले जाते. आपला अध्यात्मिक कार्यकाल 1948 ते 1974 च्या दरम्यान त्यांनी पूर्ण विश्वभरात अध्यात्मिक प्रेम, शांती आणि आशा यांचा संदेश दिला.

परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी 1957 मध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ रीलिजन्स ची स्थापना केली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली 4 विश्वधर्म संमेलने (1957, 1965, 1969, 1970) मध्ये आयोजित केली गेली. तदनंतर फेब्रुवारी 1974 मध्ये त्यांनी मानव एकता संमेलनाचे आयोजन केले. ते असे प्रथम महापुरुष होते की ज्यांनी 1 ऑगस्ट,1974 रोजी भारतीय संसदेला संबोधित केले.

या प्रसंगी शांति अवेदना सदन, राज नगर, नवी दिल्लीत कॅन्सर पीडित बंधू-भगिनीं करिता आपल्या मिशन कडून औषधे, फळे आणि अन्य उपयुक्त वस्तूंचे वितरण केले.

या व्यतिरीक्त गौतम नगर स्थित श्रीमद दयानंद वेदार्ष महाविद्यालयात (गुरुकुल) वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता यांकरिता तसेच सादिक नगर मध्ये स्थित जनता आदर्श अंध विद्यालय आणि अमर कॉलनी, लाजपत नगर स्थित अंध विद्यालयामध्ये नेत्रहीन विद्यार्थ्यांकरिता मिशन कडून औषधे, फळे व अन्य उपयुक्त वस्तूंचे मोफत वितरण केले गेले.

21 ऑगस्ट 1974 रोजी परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या निजधामी प्रस्थानानंतर दयाल पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज यांनी त्यांच्या या कार्याला पुढे चालविले आणि त्यांच्या उपरांत संत राजिन्दर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वभरामध्ये परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी सुरू केलेल्या अध्यात्मिक कार्याला मोठ्या तेज गतीने पसरवित आहेत.

सावन कृपाल रुहानी मिशन चे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वात ध्यान-अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांति चा संदेश प्रसार करीत आहेत. ज्याचे फलस्वरुप त्यांना विभिन्न देशांकडून अनेक शांतिपुरस्कारासह पाच डॉक्टरेट च्या पदव्यांनी सुद्धा सन्मानित केले आहे.

सावन कृपाल रुहानी मिशन चे आज संपूर्ण विश्वभरात 3200 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित आहेत. तसेच मिशनचे अध्यात्मिक साहित्य विश्वाच्या 55 हुन अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजयनगर, दिल्ली मध्ये आहे तसेच आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिकेत स्थित आहे.