हिवताप, डेंगूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी जनशक्ती संगठनेच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन

0
20

गोंदिया :-शहरातील छोटा गोंदिया , गोविंदपुर , संजयनगर परिसरात विशेषतः छोटा गोंदियात गत 1 ते दीड महिन्यांपासून डेंगू , मलेरिया आजाराचा तीव्रतेने प्रसार झालेला आहे . घरां-घरांत या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. परिसरात घर-घरांत सर्दी , तापाचा थैमान , हाहाकार आहे. या गंभीर समस्येने मोठे- बुजुर्ग नागरीकांसोबतच लहान-लहान बालके अधिक प्रभावित होत आहेत. डेंगू आजाराने छोटा गोंदिया परिसरात 2 बालकांची म्रत्यू ही झालेली आहे. परिसरात जीवघेण्या मच्छरांची (डास) संख्या वाढत आहे. या आजाराने परिसरातील नागरीकांना दवाखान्यात भर्ती होण्याची पाळी आलेली आहे.परिसरातील अनेक रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. नागरीकांमध्ये या गंभीर आजारामुळे, समस्येमुळे भितीचे वातावरण आहे. या गंभीर समस्येबाबत परिसरातील नागरीकांद्वारे जनशक्ती संगठनेच्या पदाधिकार्यांना माहिती दिली असता , आज  25 आँगष्ट रोजी जनशक्ती संगठने द्वारे या गंभीर समस्येच्या निवारण व प्रतिबंधासाठी व्यापक कार्यक्षम उपाययोजना करनेसाठी, परिसरात औषध फवारणी करने आणि नागरीकांना विशेषतः रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणेसाठी तसेच परिसरातील गरजू आणि गरीब कुटुंबियांना मच्छरदाणीचे वाटप करणेची मागणी करण्यासाठी आज गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष  अशोकरावजी इंगळे यांना निवेदन देण्यात आले. सोबतच निवेदनाच्या प्रतीलिपी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार  विनोद अग्रवाल , मुख्याधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी डाँ. वेदप्रकाश चौरागडे यांना देखील पाठविण्यात आल्यात. विशेष बाब म्हणजे , वरील सर्व जनप्रतिनिधी , अधिकार्यांना निवेदन देण्यापुर्वी 2-3 दिवशांपूर्वी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून परिसरातील या गंभीर समस्येच्या बाबतीत त्यांना अवगत करून योग्य कारवाई करण्यासाठी जनशक्ती संगठनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती देखील केली होती. यावेळी मा. नगराध्यक्ष महोदयांनी निवेदन की मागण्यांचा विचार करता , या डेंग्यू , मलेरीया आजाराच्या प्रतिबंधासाठी नगर परिषद प्रशासन द्वारे सर्वोतोपरी उपाययोजना आणि कारवाई केली जाईल, असे जनशक्ती संगठनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले. तसेच या विषयावर उद्या दि. 26 आँगष्ट रोजी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करनेसाठी आयोजित बैठकीमध्ये संगठनेच्या पदाधिकार्यांना उपस्थित राहणेसाठी आमंत्रित केले. निवेदन देते वेळी जनशक्ती संगठनेचे संयोजक तिर्थराज ते. उके , अध्यक्ष मयूर मेश्राम , सचिव अनिल शरणागत, मार्गदर्शक/ संगठक ताकेश पहिरे , कोषाध्यक्ष कैलास शेंडे और उपाध्यक्ष राजेश (पिंटू) मेश्राम , उपाध्यक्ष रमेश सोनवाने, सहकोषाध्यक्ष डेईराम (छोटू) ठाकरे, सहसचिव आशिष उईके, संगठक आफताब अंसारी, प्रसिद्धी प्रमुख रोशन पाचे आदी संगठनेचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.