आता बँक खात्यात पैसे नसतील तरी काढता येतील 10,000 रुपये; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

0
67

देशभरातील शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक याना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवण्यात येतात.यांपैकी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) सुरु होऊन आज 7 वर्षे पूर्ण झाली. ही योजना जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम असलेली आर्थिक योजना आहे, असं म्हणता येईल. दरम्यान, या योजनेअंतर्गत 18 ऑगस्ट 2021 पर्यंत 43 कोटींहून अधिक नागरिकांची खाती उघडण्यात अली असल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली आहे. जन धन योजने अंतर्गत खातेधारकांना अनेक सुविधा मिळतात.

जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात किमान रक्कम किती शिल्लक असावी यांदर्भात कुठलीही अट नाही. मात्र, आनंदाची बातमी म्हणजे जर तुम्ही जनधन खातेधारक असाल आणि तुमच्या खात्यात काहीही रक्कम शिल्लक नसेल तरी तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. यासोबत खातेदाराला रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) आणि ओव्हरड्राफ्ट (Overdraft Service) देण्याची अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे.

10,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा अर्थ काय?

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे. मात्र, ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यांनी मिळते. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. अन्यथा फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.