राज्यात २ मे पासून शाळांना सुट्टी

0
34

मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमधील उन्हाळी सुट्टी २ मे २०२२ पासून जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी २ मे ते १२ जून पर्यंत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ४१ दिवस शाळा बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्यातल्या शाळांमध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला.

१३ जूनपासून नवीन सत्र सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे. तर विदर्भात दिवसा तापमान जास्त असल्याने २७ जूनपासून तेथे शाळा सुरू होणार आहेत.शाळांमध्ये सध्या ऑफलाइन परीक्षांची तयारी सुरू आहे. येथे इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे.