व्यंकय्या नायडूंचा निर्णय शिवसेनेच्या मदतीला

0
78

मुंबई : भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आता शिवसेनेच्या मदतीला धावले आहेत. दोन खासदारांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नायडू यांनी अपात्र ठरवले होते. नायडू यांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने हाच न्याय आता राज्यातील एकनाथ शिंदे गटाला लावण्यात येण्याची शक्यता आहे. सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमदार अथवा खासदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाया, त्यांच्या अपात्रतेसाठी कारणीभूत ठरू शकतात, हा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बिहार जनता दल युनायटेडचे दोन खासदार शरद यादव आणि अन्वर अन्सारी यांचे राज्यसभा सदस्य पद रद्द करताना दिला होता. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहाच्या बाहेर केलेल्या पक्षविरोधी कारवायाना सुद्धा लागू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दोन खासदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीतील शिंदे गटाच्या शिवसेना पक्ष विरोधी कारवायांच्या संबंधात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना खूप सहाय्यभूत ठरणार आहे. असे झाल्यास झिरवाळ यांनी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम राहू शकतो.