बंडखोरांविरुद्ध भूतानची मदत घेणार?

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनितपूर : आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँडच्या (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे़ उल्फाविरोधी मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क साधण्याचाही सरकारचा विचार आहे़

एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़

कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त सोनितपूरचा दौरा केल़ा़ बोडो बंडखोरांचा हिंसाचार सरकार कदापी सहन करणार नाही़ एनडीएफबी (एस) विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी (एस) विरुद्ध निश्चितपणे मोहीम छेडली जाईल; मात्र कधी, हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़