भोपाळ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली.
सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, मात्र पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवावी, असे पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी म्हटले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष १४ राज्यांमध्ये विस्तारला व २००४ व २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले.
आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे प्रत्येक काँग्रेसजनाचे मत असल्याचेही ते पुढे म्हणाले.