24.1 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home राष्ट्रीय देश फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्या ताब्यात

फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 3 जण NIAच्या ताब्यात

0
27
श्रीनगर, दि. 28 – काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर, अलताफ शाह आणि मेहराज उद्दीन कलवल या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात  घेतले आहे.
हे तिघंही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते आहेत. अलताफ शाह हा गिलानी यांचा जावई आहे.  काही दिवसांपूर्वी ‘एनआयए’नं या सर्व हुर्रियत नेत्यांच्या घरावर छापा मारला होता. या तिघांनाही बुधवारी (28 जून) नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी पाकिस्तानकडून मिळणा-या आर्थिक मदतीसंबंधी ‘एनआयए’नं तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.