शहरात ५० ठिकाणी चालतो सट्टाव्यवसाय,महिन्याकाठी पोलिसांकडून होते २ लाखाची वसुली?

0
29

शहर पोलिस ठाण्यातील थेर,पाचे व राठोड करतात वसुली?
सिव्हिल लाईन,छोटा गोंदिया,शास्त्री वॉर्डातील वसुली होते नूरी चौकातील एका पानठेल्यावर
गोंदियाच्या मळी चौकात केबिन टाकून चालतोय सट्टा
नियुक्ती आमगाव पोलिस ठाण्यात सट्टा वसुली मात्र गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीत

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.28-गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़.अशा धंद्याकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसीङ्कच दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.त्यातही गोंदिया शहरातील सट्टाव्यवसायिकांकडून मंथली वसुलीसाठी पोलिसांची एक टिमच कार्यरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.त्यामध्ये प्रामुख्याने गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील थेर,पाचे व राठोड यां पोलिसांची नावे सट्टाव्यवसायिकांच्या दुकानपरिसरात नेहमीच एैकली जातात.गोंदिया शहरात शहर पोलिस ठाणे व रामनगर पोलिस ठाणे असून सर्वाधिक सट्टा हा शहर पोलिस ठाण्याच्या भागात तोही हायटेक व केबिनमध्ये रूममध्ये चालत असल्याचे चित्र आहे.गोंदिया शहर पोलिस एकीकडे आम्ही सट्टाव्यवसायावर नियंत्रण आणल्याचे सांगत असतानाच पोलिसांच्या आशीर्वादानेच शहर पोलिस ठाण्यातील सट्ट्याला चांगला जोम आले असून पोलिसच आत्ता सट्टा व्यवसाqयकाच धंदा वाढावा व त्या धंद्यातून आपला धंदा चालावा यासाठी काम करताना दिसून येत आहे.गोंदिया शहर पोलिस व रामनगर पोलिस ठाणे मिळून सुमारे ४० ते ५० लहान मोठी सट्यांची दुकाने असून या दुकानातून २ हजारांपासून ते १० हजारापर्यंतंची वसुली पोलिसांच्यावतीने केली जाते त्याचा अंदाजे आकडा हा दोन लाखाच्या जवळपास असल्याचा सूर एैकू येत आहे.या सट्ट्याव्यवसायिकांनी परमीट दिल्यासारखीच धंदा सुरू असल्याने पोलिसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.त्यातच मढी चौकातील एका व्यक्तीने २२ एप्रिल २०१७ रोजी लेखी तक्रार सट्टाव्यवसायाबद्दल करीत गोंदिया पोलिसांनाही त्यात गैरअर्जदार आरोपी केलेले आहे.यावरून पोलिसांची भूमिका सट्टाव्यवसायिकांप्रती कशी आहे हे त्या तक्रारीवरून स्पष्ट झाले असून त्या तक्रारीत पोलिसांची नावे सुद्धा स्पष्टपणे लिहिली गेली तरीही त्यांच्यावर अद्याप कारवाई झाल्याचे कुठेच दिसत नसून ते पत्रच पोलिस विभागाने दाबले की काय अशी चर्चा आहे. दरम्यान आमगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दसुरकर यांना थेर यांच्या नोकरीस्थळाबाबत विचारणा केली असता कुणी कोठेही काम करु शकतो ती विभागाची आंतरिक प्रशासकिय बाब असल्याचे सांगून थेर यांच्याबाबत बोलणे टाळले.
गोंदिया शहराचा विचार केल्यास शहरात चार ते पाच मोठी सट्टाव्यवसायिक आहेत.त्या सट्टाव्यवसायिक फक्त सट्टच्याच धंदा करतात असे नाही तर विविध धंद्यात यांचे हात रंगलेले आहेत.कुणी रॉकेलच्या काळाबाजारात ,कुणी रेशनच्या काळाबाजारासह भंगाराच्याही धंद्यात असल्याचे बोलले जात आहे.एक तर कचरा मोहल्ला परिसरातील जुना सावकारही या धंद्यात उतरल्याचे बोलले जात आहे.भाजीबाजार चौक,जयस्तंभ चौक,मळीचौक,उड्डाणपुलाच्या खाली,टेलिफोन एक्स्चेंज समोरील बंद पंपासमोर,रामनगरात तर पोलिस ठाण्याच्या अगदी मागच्या लागून असलेल्या भागात,नूरी चौक,चांदणी चौक,शंकर चौक,बाजपेयी चौक,भीमनगर,मसानी चौक,गंजबाजार आदी ठिकाणी ही दुकाने असून मुर्री परिसरात ३ ते ४ अवैद्य सट्ट्याच्या दुकानातून बिनदिक्कत धंदा चालत आहे.शहरातील मळी चौकात तर चांगल्या हायटेक व केबिन बंद दुकानात आरामात बसून हा व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांत असंतोष दिसून येत आहे.विशेष म्हणजे मोठ्या व्यावसायिकांचा धंद्यावर फरक पडू नये यासाठी पोलिस छोट्या दुकानदाराला खाकीचा धाक दाखवून दुकान बंद करायला लावतात असेही प्रकार शहर पोलिस ठाणेंतर्गत घडू लागले आहेत.त्यातच सिव्हिल लाईन,शास्त्री वॉर्ड,छोटा गोंदिया,डबqलग,संजयनगर भागातील सट्टाव्यवसाqयकाची वसुली ही सिव्हीललाईन भागातील नूरी चौकातील एका पानठेल्यावर गोळा केली जाते त्या पानठेल्यातून सकाळ संध्याकाळ दोनवेळा संबंधित पोलिस हा वसुलीची रक्कम घ्यायला येत असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.या सर्व सट्टाव्यवसायिकांचा केंद्रqबदू मात्र लेबर चौकात असल्याची चर्चा आहे.त्यातच गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील घनश्याम थेर यांच्याबद्दल तर सट्टाव्यवसायिकांनुसार ठाणेदाराच्या रकमेसह आपल्या स्वतःसाठी वेगळे दोन हजार मागत असल्याची चर्चा असून थेर यांनी नुकतेच फूलचूर परिसरात बनविलेले घर हे ठाणेदारच काय उपविभागीय पोलिस अधिकारीही आपल्या नोकरी कार्यकाळात बनवू शकत नाही अशा आलिशान असल्याची चर्चा आहे.त्यातच थेर यांची बदली आमगाव पोलिस ठाण्यात असताना ते मात्र गोंदिया शहरातील सट्टाव्यवसायिकाच्या वसुलीसाठी फिरत असल्याचे बोलले जात आहे.एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टाव्यवसायिकावर जेव्हा धाड टाकली जाते ती फक्त शो रेड असते.मुख्य सट्टाqकगला न पकडता त्याच्या दुकानात हजार दोन हजाराची नोकरी करीत बसलेल्या कागदावर सट्टापट्टी लिहितो त्याला पकडून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया केली जाते असे म्हणणे आहे.आजपर्यंत गोंदिया शहर पोलिसांनी एकही मोठा सट्टा qकग,दारुमाफीया,क्रिकेटबुकीवर गुन्हा दाखल करून त्यांला पोलिस कोठडीत पाठवल्याचे चित्र तरी गेल्या दोन तीन वर्षात बघावयास मिळालेले नाही.
आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्र्षात कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरुणांनी सट्टा पट्टीला स्वतः:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरुणांच्या गरजा भागू शकत नाहीत, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरुण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरुणांना सव्वा रुपयात शंभर रुपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाèयांची संख्या वाढत आहे. त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे.गोंदिया शहर पोलिस स्टेशन,रामनगर पोलिस स्टेशन,अर्जुनी मोरगाव,गंगाझरी,दवनीवाडा,रावनवाडी पोलिस स्टेशन आणि गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.