बराक ओबामांच्या सुरक्षेबाबतचा अमेरिकेचा हट्ट भारताने धुडकावून लावला

0
8

नवी दिल्ली – बराक ओबामांच्या भारत दौ-याबाबत सोमवारी अमेरिकी व भारतीय अधिका-यांची बैठक झाली. यात अमेरिकेने ओबामांची सुरक्षा अापल्याकडेच ठेवण्याचा प्रस्ताव मांडला, पण भारताने तो फेटाळला. प्रजासत्ताक दिन हा भारताचा सोहळा आहे, यामुळे सुरक्षाही आम्हीच करणार, असे भारतीय अधिका-यांनी सुनावले.

अमेरिकेच्या या 4 मागण्या, भारताने फेटाळल्या
1.फक्त अमेरिकी स्नायपर्स तैनात : हे शक्य नसल्याचे भारताने सांगितले. राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक व्हीव्हीआयपी असतील. यामुळे भारतीय स्नायपर्सही तैनात राहतील.
2.ओबामांच्या रस्त्यावरून कुणीही जाऊ नये : हे शक्य नसल्याचे भारताने सांगितले. पाहुण्यांचा मार्ग यजमानच ठरवतात. अता राष्ट्रपती, पीएम व इतर व्हीव्हीआयपीही त्याच रस्त्याने जातील.
3.राष्ट्रपती मुखर्जी व ओबामा स्वतंत्रपणे जातील : मुख्य पाहुणे राष्ट्रपतींसोबतच जातात, असे भारताने स्पष्ट केले. यामुळे पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष ओबामा आपल्या ‘बीस्ट’ कारमधून प्रवास करणार नाहीत.
4.सोहळ्याला नो फ्लाय झोन घोषित करावे : भारताने मान्य केले असते तर वायुसेनेचा पारंपरिक फ्लाय पास्ट रद्द झाला असता. आता 33 लष्करी विमाने राजपथावर तिरंग्याला सलामी देतील.
27 जानेवारीला काही वेळेसाठी दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे बंद राहील.