मारन यांच्या माजी अतिरिक्त सचिवाला अटक

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : तत्कालीन दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांचे अतिरिक्त स्वीय सचिव व्ही. गोवथामान यांच्यासह तीन जणांना सीबीआयने रात्री उशिरा अटक केली. मारन यांच्या निवासस्थानी ३०० हायस्पीड टेलिफोन लाईन्स पुरविण्यात गोवथामान यांनी मुख्य भूमिका वठवली होती. या लाईन्सचा वापर मारन यांच्या बंधूंच्या टीव्ही वाहिनीसाठी करण्यात आला.
मुख्य तांत्रिक अधिकारी एस. कन्नान आणि मारन बंधूंच्या सन टीव्ही नेटवर्कमध्ये इलेक्ट्रिशियन राहिलेल्या एल.एस रवी याचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.