कोया पुनेम उत्सवात सात राज्यातील आदिवासी

0
17

सालेकसा : पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान कचारगडच्या वतीने राष्ट्रीय गोंडवाना महा अधिवेशन व कोया पुनेम संमेलन ३१जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. आदिवासी समाजाचे पवित्र धार्मिक व श्रध्दा स्थळ असलेल्या कचारगड येथे सात राज्यातील लाखो आदिवासी बांधव श्रध्देने येतात. या अधिवेशनात आदिवासी जमात यांची संस्कृती, परंपरा, बोली-भाषा, रीतिरिवाज, नृत्यकला यांचे प्रदर्शन करण्यात येईल.
शनिवारी ३१जानेवारीला गढ जागरण, पेनपूजा सुरू केली जाईल. प्रेमसिंह दादा सल्लाम गोंडी धर्माचार्य व्दार गोंडी पुनेमवर प्रवचन सादर करतील. रात्री ८ वाजता राष्ट्रीय गोंडियन पारंपरिक समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येईल. रविवारी १फेब्रुवारीला कोया पुनेम महासंमेलन सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येईल. गोंडी धर्म झंडा ध्वजारोहक मोतीरावण कंगाली व गोंडवाना राष्ट्रीय ध्वजारोहक आ. संजय पुराम ध्वजारोहण करतील. दुपारी १२ वाजता रॅली फुलवादेवी कंगला माझी यांच्या अध्यक्षतेखाली व शेरसिंह आचला यांच्या हस्ते उद््घाटन करून काढण्यात येईल.
सोमवारी २ फेब्रुवारीला सकाळी ११वाजता राष्ट्रीय गोंडवानाचे महाअधिवेशन होईल. या अधिवेशनाचे उद््घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा करतील. अध्यक्ष खा. अशोक नेते असून प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी राज्यमंत्री अंबरिश आत्राम उपस्थित राहतील. मंगळवारी ३ फेब्रुवारीला गोंडीधर्म महासभा होणार असून उद्घाटक प्रा. वसंत पुरके व अध्यक्ष एस.पी. सोटी (छत्तीसगढ) हे राहतील. बुधवारी ४ फेब्रुवारीला कार्यक्रमाचे समापन जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने होईल.
अध्यक्ष जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर राहतील. ४वाजता प्रेमसिंह दादा सल्लाम गोंडी धर्माचार्य व्दारे गोंडी पुनेमीवर प्रवचन होईल.
या कचारगढ कोया पुनेम संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन दुर्गाप्रसाद कोकोडे, रमण सल्लाम, संतोष पंधरे, मनीष पुराम, शंकरलाल मडावी, बारेलाल वरखडे, रामेश्‍वर पंधरे यांनी केले आहे.