नवी दिल्ली – तीन दिवसांच्या दौर्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा सौदी अरेबियाकडे रवाना झाले आहेत. सौदीमध्ये तेथील शासकांच्या निधनानंतर अमेरिकेच्या वतीने बराक ओबामा त्यांचा शोक व्यक्त करणार आहे. या भारताचा ऐतिहासिक दौरा संपवून परतताना ओबामांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे.
दुपारी बरोबर 1. 50 वाजता बराक ओबामा पालम विमानतळावर दाखल झाले. याठिकाणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ओबामांना निरोप दिला. यावेळी अधिकार्यांचीही उपस्थिती होती. बराक ओबामा यांनी विमानात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा एकदा भारतीय पद्धतीने नमस्कार करत भारतीय दौर्याचा समारोप केला. त्यानंतर ओबामा आणि मिशेल यांनी विमानात प्रवेश केला आणि दोन वाजेच्या सुमारास विमान सौदीकडे रवाना झाले.