37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश केंद्रीय कर्मचा-यांची निवृत्ती ६० व्या वर्षीच

केंद्रीय कर्मचा-यांची निवृत्ती ६० व्या वर्षीच

0
17

blank

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचा-यांची सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ करण्याचा विचार नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या नोक-यांवर बंदी घातलेली नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील सरकार नोक-यांवर बंदी घालण्याचा आदेश देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली निवडणुकीत या दोन्ही मुद्द्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे सरकारला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. यूपीए सरकारच्या शेवटच्या टप्प्यात सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होईल, अशीही चर्चा होती.

blank