महाराष्ट्रात 415 आयएएस आणि 317 आयपीएस अधिकारी;दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ        

0
7

 नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्रात प्रशासकीयसोयीसाठी  आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे समजल्या जाणा-या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 415 आणि भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस )317 अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 2016 ते 2018 या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिका-यांच्यापदांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिका-यांची संख्या 361 हून वाढून 415 झाली आहे तर आयपीएस अधिका-यांची संख्या 302  हून वाढून 317 झाली आहे.  प्रधानमंत्री कार्यालय तथा कर्मचारी ,जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली .

केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशातील आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत वर्ष 2016 ते 2018 दरम्यान देशातील एकूण 10 राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार710 आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत 361 हून 415 एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे.  वर्ष 2016 ते 2018  दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयासह  देशातील एकूण 13  राज्यांमधील आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 277 आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत 302 हून 317 एवढी वाढ झाली  आहे.