आरोग्य विभाग पोहोचला आदिवासींच्या दारी;मुरकुडोह येथे प्रत्येक गुरुवारी आरोग्य शिबीर

0
18

गोंदिया,दि.२६  जुर्ले : : मागील 70 वर्षांपासून आरोग्यासह विविध समस्यांनी त्रस्त सालेकसा तालुक्यातील मूरकूडोह, दंडारी आणि टेकाटोला येथील आदिवासी परिवारांना मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने त्यांच्या निर्देशावरून मुरकुडोह क्र.3 येथे गुरुवार 25 जुलै रोजी पहिले आरोग्य शिबिर घेण्यात आले. दरम्यान रुग्णांच्या तपासणीसह त्यांना आरोग्या संदर्भात डॉक्टरांच्या चमूने मार्गदर्शन केले. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांवर आदिवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.
सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या मुरकुडोह, दंडारी आंणि टेकाटोला या शंभर टक्के आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गावांमध्ये आज पर्यंत वीज पोहोचलेली नाही, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, अनेकांना राहायला पक्के घर नाहीत, गावात पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, शिक्षणासाठी शाळा नाहीत, अशा विविध समस्यांची माहिती पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना कळताच त्यांनी सालेकसाचे तहसीलदार, आरोग्य अधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि ईतर विभाग प्रमुखखाना तत्काळ गावांचा दौरा करून सविस्तर अहवाल मागविला. दरम्यान अहवालाच्या आधारे आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. आरोग्याची गंभीर समस्या असल्याने प्रत्येक गुरुवारी मुरकूडोह येथे आरोग्य शिबीर घेण्याचे ठरले दरम्यान  गुरुवार 25 जुलै रोजी पहिला शिबिर घेण्यासाठी तालुका आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली. संपूर्ण गावात गाडी फिरवून आरोग्य संदर्भात जनजागृती करण्यात आली शिबिरात मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी आरोग्य संदर्भात आदिवासी नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले गंभीर आजारावर शासनाकडून योजनांच्या माध्यमातून निशुल्क ऑपरेशन केले जातात यासंदर्भात माहिती देखील दिली. गावात पहिलेवहिले आरोग्य शिबीर असल्याने आणि पालकमंत्र्यांनी येथील गंभीर समस्यांची दखल आवर्जून घेतल्या आदिवासी नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. एवढेच नव्हे तर मागील अनेक वर्षात जे झाले नाही ते आता पालकमंत्र्यांच्या विशेष कामगिरीमुळे होत असल्याचा समाधान त्यांनी व्यक्त केला आहे.

दरेकसा येथे आधार शिबिर
अनेक आदिवासी नागरिकांचे आधार कार्ड बनलेले नाही त्यामुळे त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे समस्या लक्षात घेता दरेकसा येथे आधार कार्ड शिबिर घेण्याचे तालुका प्रशासनाने ठरविले आहे या शिबिरात आधार कार्ड बनविणे जुने आधार अपडेट करणे आधार लिंक करणे असे विविध कार्य हाती घेतले जाणार आहे आदिवासींना ते निशुल्क राहणार आहे.

विविध योजनांचा लाभ मिळणार
शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत सुविधा विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासींच्या घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून प्रशासन करत आहे गुरुवारी आरोग्य शिबिरा बरोबरच विविध योजनांसाठी करावी लागणाऱ्या अर्जांच्या प्रती आदिवासी नागरिकांना वितरित करण्यात आल्या अर्ज भरल्यानंतर त्या योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे हे विशेष