32.1 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ ओबीसींनी सामाजीक स्वातंत्र्याची लढाई लढावी-डॉ.गुरूदास येडेवार

ओबीसींनी सामाजीक स्वातंत्र्याची लढाई लढावी-डॉ.गुरूदास येडेवार

0
138

आमगांव,दि.24- ओबीसी समाज जाती-जातीत विखुरला असल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही कोणतीच सरकार ओबीसीला मोजायला तयार नाही, त्यांना संख्येप्रमाणात भागीदारी दयायला तयार नसेल तर आता कुणबी, तेली, माली, नाव्ही, घोबी, पोवार, सोनार, कलार, लोहार, सुतार इत्यादी जातींनी आपली जात सोडून ओबीसी बनावे कारण संवैधानिक अधिकार जातीला नसून संवर्गाला आहेत. तेव्हा अधिकारविहिन असलेल्या ओबीसी समाजाने संघटित होवून आपल्या सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढावी. असे प्रतिपादन डॉ.गुरूदास येडेवार जिल्हा संघटक ओबीसी सेवा संघ गोंदिया यांनी आसोली संवैधानिक राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत महाशिवरात्री पर्वावर छत्रपती शिवाजी जयंती निमित्त आयोजित ‘‘लोकजागर‘‘ समारोहात केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

समारोहाचे उद्घाटन ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले असून एप्रिल-२०२० पासून सुरू होत असलेल्या भारतीय जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र रकाना नसल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचे ठराव पारित करण्याचे आव्हान केले. याप्रसंगी विचारमंचावर डॉ.सविता बेदरकर, सावन कटरे, सुशिल बन्सोड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. स्त्रियांनी राष्ट्रमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुलेंचें संस्कार आपल्या मुलांबाळात रूजवावे. कारण दारूच्या व्यसनामुळे घरचे घर बरबाद झालेत. शेतकरी आत्महत्या करताहेत. मुले व्यसनाधिन होवून दंगलीत मारली जात आहेत, तेव्हा स्त्रीयांनी घराघरात शिवबा तयार करावा असे सविता बेदरकर म्हणाल्या. अल्पसंख्याकांनी बहुसंख्यांक ओबीसी-शेतकरी जातींना आपल्या राजकिय-धार्मिक संघटनांमध्ये जोडून राज्यकर्ते झाले पण मागासवर्गीय ओबीसी qहदूना संवैधानिक अधिकार न दिल्यामुळे ओबीसी असलेला शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करित आहे.

तेव्हा ओबीसींनी आपल्या संघटना बळकट करून सामाजिक आंदोनातून आपले प्रश्न सोडविण्याचे आवाहन सावन कटरे यांनी केले. ओबीसींचे मंडल आयोग असो वा जातनिहाय जनगणना असो बौद्ध समाज नेहमीच सोबत राहिलेला आहे. आम्ही पुढे पण सोबत राहू असे सुशिल बन्सोड म्हणाले. याप्रसंगी अशोक पटले, एड.सेवकराम बागडे, दिनदयाल बघेले, रामेश्वर शेंडे, क्रिष्णा बहेकार यांनी सुद्धामनोगत व्य्नत केले. जि.प.हायस्कूल आमगांव व केंद्रिय वरिष्ठ प्राथमिक शाळा तिगांवच्या विद्याथ्र्यांनी महापुरूषांच्या प्रबोधनपर गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

‘‘मी सावित्री बोलते -मी जीजाऊ बोलते‘‘ हे एकपात्री प्रयोग तिगांवच्या विद्याथ्र्यांनी सादर करून श्रोत्यांची मने qजकली. कार्यक्रमाचे संचालन भूमेश शेंडे, हरिष राऊत यांनी केले असून द्वारपाल बोपचे यांनी पाहुण्यांचे आभार मानले. रात्री सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजिरी वादक संघपाल पवनुरकर महाराज व संच वर्धा यांनी संगीतमंच प्रबोधन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोqवद कटरे, निलकंठ बोपचे, मनोज हरिणखेडे, रविकांत भगत, संतोष मेश्राम, चंदू उके, देवेंद्र पारधी, योगेश हरिणखेडे, दुलिचंद कथलेवार, रवि शेंदरे, सुनिल डोहळे, काशिनाथ तरोणे, निलकंठ डोहळे, छगन बोपचे, संतोष बघेले, हरिराम कथलेवार व गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले.