पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाळ जोडून ठेवणे ही भाजपाची परंपरा= इंजि.राजकुमार बडोले

अर्जुनी-मोर येथे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन

0
206

अर्जुनी मोर. :- भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाच्या विकासाची आहे. केंद्र सरकार अनेक विकासात्मक उपक्रम राबवून थेट योजना गोरगरीबा पर्यंत पोहचवित आहे. राज्यात मागील फडणवीस सरकारच्या काळातही शेतकरी शेतमजूर व अन्य गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना व धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. सर्वत्र राज्यात सुबत्ता होती. आता मात्र तीन तिगडी सरकारमुळे अनेक विकासाची व गोरगरिबांची कामे अडकली आहेत. गोंदिया जिल्ह्यात रेतीचा विषय गंभीर होत चालला आहे. सहा महिन्यापासून निराधारांना अनुदान दिले जात नाही, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास विलंब होत आहे. अनेक विकासात्मक व धोरणात्मक कार्यक्रमात सध्याचे राज्य सरकार अपयशी ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यात भाजपाचे लोकांना व संस्थांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. अर्जुनी मोरगाव तालुका हा भाजपचा गड राहिला आहे. पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तथा सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा गड कायम ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. जिल्ह्यातील भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षनिष्ठ आहे. ही ताकद आपल्याला अशीच कायम ठेवून ुढे येणार्‍या निवडणुका जिंकायचे आहे त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाळ जोडून ठेवणे हीच भाजपाची परंपरा असल्याचे आवाहन माजी पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले आहे.
त्रिमूर्ती पेट्रोल पंप अर्जुनी-मोर येथील डॉ.गजानन डोंगरवार यांचे येथे सुरू करण्यात आलेल्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते. कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रचना गहाणे, तालुका भाजपा अध्यक्ष अरविंद शिवनकर, ज्येष्ठ नेते नामदेव कापगते,डॉक्टर गजानन डोंगरवार, केवळ राम पुस्तोडे, ओबीसी मोर्चा जिल्हा आघाडी अध्यक्ष उमाकांत ढेंगे ,रामदास कोहाडकर, प्रकाश गहाणे, विजया कापगते, लक्ष्मीकांत धानगाये, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविकातून भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी तालुक्यात सर्व कार्यकारिणी तयार करून सर्व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगून तालुक्याचा अहवाल सादर केला. संचालन गोंदिया जिल्हा महासचिव लायकराम भेंडारकर यांनी केले. सभेला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.