देवरी तालुका राकाँच्या बैठकीत निवडणुकींवर चर्चा

0
208

देवरी,दि.21ः-सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा व्हायची आहे. परंतु, पक्ष पातळीवर पूर्व तयारीसाठी देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका बैठक तालुकाध्यक्ष सी. के. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, पंसचे माजी सभापती इंदल अरकरा, संचालक भय्यालाल चांदेवार, आदिवासी नेते फगनोजी कल्लो, अमरदास सोनबोईर आणि बबलू भाटिया उपस्थित होते. बैठकीत आगामी काळात तालुक्यात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकी विषयी चर्चा करुन गावागावात पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांच्या समस्या तथा विचार जाणून घेण्यात आले. बैठकीला तालुका महिलाध्यक्षा पारबता चांदेवार, माजी नगराध्यक्षा सुमन बिसेन, तालुका उपाध्यक्ष मुन्नाभाई अंसारी, महासचिव दिलीप दुरुगकर, मनोहर राऊत, योगेश देशमुख, मुकेश खरोले, सुजीत अग्रवाल, हरिभाऊ राऊत, तेजराम मडावी, मनिष मोटघरे, बबलू पठाण, जाकीर सैय्यद, सत्यवान देशमुख, मंजुषा वासनिक आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.