एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

, अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हातात बांधले घड्याळ

0
575

मुंबई,दि.23(वृत्तसंस्था)ः- भाजप रामराम ठोकून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी यांनी सीमोउल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती आहे.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मला भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याबद्दलम मी शरद पवारांचा मनापासून आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले होते. मला आता नव्या संधींची अपेक्षा नव्हती. पण मला छळण्यात आले. पक्षासाठी चाळीस वर्षे संघर्ष केला. पण पक्षाने माझ्या मागे अँटी करप्शन लावले. इनकम टॅक्स लावले आहे. मी भारतीय जनता पक्षाचे काम जेवढ्या निष्ठेने केले तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कामही निष्ठेने करणार आहे. भारतीय जनता पक्ष जसा वाढवला त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढू असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दिला आहे.

राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, भलेभले नेते, ज्यांच्यावर शरद पवारांनी विश्वास ठेवला ती माणसे विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला सोडून दिली. पण शरद पवारांचे विचारच राज्याच्या राजकारणात जनता स्वीकारेल हा ठाम विश्वास आम्हाला होता. सगळ्यांसमोर विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अनेक घटना आहे. शरद पवार वयाच्या ७९ व्या वर्षीही राज्यभर फिरले, तरुण कार्यकर्ते खवळून उठला होता. सुडबुद्धीने शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली, त्यातून आताच्या सरकारचा पाया रचला गेल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.